Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

18 - लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | lokkalyankari swarajyache vyavashtapan swadhyay / Online Test

पाठ 18वा - लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | lokkalyankari swarajyache vyavashtapan swadhyay / Online Test


मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची आठ खात्यांत विभागणी केली, हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला. 


पर्यावरणाचे संरक्षण

आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत, याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. उदा. आरमारासाठी लहान-मोठ्या नावा, जहाजे, बल्हे, सोट इत्यादी तयार करावे लागतात. त्यासाठी लाकूड लागते. म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत. असली झाडे वर्षा दोन वर्षांत तयार होत नाहीत. प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात. ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखादे झाड जीर्ण असेल, तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे द्यावेत. 


स्त्रियांचा सन्मान

कर्नाटकातील बेलवडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली. तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढ़ी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली, तसेच तिला 'सावित्री' हा किताब दिला.


लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close