जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST Exam - ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे.
भारत सरकारने सन 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत प्रवेश दिला जातो. त्यासाठी इयत्ता पाचवीत शिक्षम घेत असलेल्या मुलांची निवड चाचणी घेतली जाते.आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. आठवीनंतर गणित व विज्ञान इंग्रजीतून तर समाजशास्त्र हिंदी मधून शिकविले जाते.
जवाहर नवोदय विद्यालय संक्षिप्त माहिती
5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते
प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते
ग्रामीण भागातील विद्यार्थी 80% व शहरी भागातील 20% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते.
0 Comments