पाठ 14वा - गड आला, पण सिंह गेला स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | gad aala pan sinha gela swadhyay / Online Test
शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यांतलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे." पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले.
तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. तानाजीला वाटले, 'महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे.' तो शेलारमामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलारमामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, "शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या.. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. ' आणि शेवटी तानाजी मालुसरे ने कोंढाणा जिंकला, पण तो धारातीर्थी पडला. म्हणून कोंढाण्याचे नाव ठेवले सिंहगड.
तानाजीचा पराक्रम
लढाईला सुरुवात झाली. उदेभानला खबर लागली. नगारा वाजला. उदेभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूर वीर ! कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले..
गड आला, पण सिंह गेला यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा.
टेस्ट कशी सोडवाल?
टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता.
गड आला, पण सिंह गेला Online Test 👇
Loading....
इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here
Share with your friends.
आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा.
0 Comments