Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

15 - एक अपूर्व सोहळा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | ek apurva sohala swadhyay / Online Test

पाठ 15वा - एक अपूर्व सोहळा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | ek apurva sohala swadhyay / Online Test



दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

गड आला पण सिंह गेला स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यांतून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता दयावी, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली.


राज्याभिषेकाचा सोहळा

राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वादये वाजू लागली. गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातांत होते. गागाभट्ट यांच्या हातांत सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला.

मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, "क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो." सर्वांनी जयजयकार केला.


एक अपूर्व सोहळा यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

एक अपूर्व सोहळा Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close