Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाठ 12वा - पुरंदरचा वेढा व तह स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | purandarcha vedha v tah swadhyay / Online Test

पाठ 12वा - पुरंदरचा वेढा व तह स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | purandarcha vedha v tah swadhyay / Online Testमराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

सुरतेवरील आक्रमणामुळे बादशाहा भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झाराजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. 

पुरंदर किल्ला पुणेपुरंदरचा रणसंग्राम

दिलेरखानाच्या तोफा पुरंदर किलल्यावर कडाडू लागल्या. तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडिमार केला. माचीचा बुरूज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेरखानाने माची जिंकली. 

मुरारबाजीने पाचशे मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले, तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता.


पुरंदरचा तह

पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलूख मुघलांस देण्याचे कबूल केले. हा तह १६६५ साली झाला.पुरंदरचा वेढा व तह यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

पुरंदरचा वेढा व तह Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments