Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

19 मार्च | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

12 मार्च | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp


इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - गोल गोल 
नव्या गोष्टी शिकवणारी मजेदार प्रश्न आणि उत्तरं.
Download link - Click Here
Read Here 👇  चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - स्वच्छ मांजर 
तुम्ही रोज अंघोळ करता पण मांजर मात्र करत नाही. मग तरी त्याला स्वच्छ का म्हणायचं? ‘भोवतालचे प्राणी’ या चार पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - प्रत्येक मिनिट महत्वाचं
दररोज नीट आवरून शाळेत चालत जाण्यासाठी आदिलकडे अख्खा १ तास असतो. पण तरीही त्याला अगदी रोज उशीर होतो. त्याचा वेळ कुठं वाया जात असेल बरं? मग त्याची मैत्रीण पारो त्याला मदत करायचं ठरवते. ती त्याच्याकडे असलेल्या तासातल्या प्रत्येक मिनिटाचा नीट हिशेब लावून देते.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - तुम्हांला खरं नाही वाटणार 
तशी ही परिचित गोष्ट. एका मुलाची. कदाचित तुम्ही त्याला ओळखतही असाल. तुम्हाला बहुदा खरं नाही वाटणार, पण त्याला आपली शाळा खूप आवडते, जरी शाळेला तो आवडत नसला तरीसुद्धा. शिक्षकांची नजर चुकवून त्याला छळणाऱ्या वर्गमित्रांना तो आवडत नसला तरीसुद्धा. एकदा तो खूप सारे मासे असलेल्या एका तळ्यापाशी जातो. तिथे त्याला ‘आपण आता एकटे नाही,’ हे लक्षात येतं.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 
 





Share with your friends

  

Post a Comment

0 Comments

close