समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२5 प्रवेशपत्र / Admit card / Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे.
केंद्रप्रमुख भरती घटक निहाय Video मार्गदर्शन / Notes - Click Here
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम PDF व प्रश्नपत्रिका स्वरूप - Click Here
परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. उमेदवारांच्या नावात बदल इ. झालेला असल्यास त्यासंबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूळ तसेच छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
प्रवेशपत्र 28 तारखेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील.



0 Comments