आदिवासी बोलीभाषेतील पाठ्यपुस्तके PDF डाउनलोड | आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तकांचे कोरकू, गोंडी, भिल, माथवाडी, मावची माडिया, कोलामी, भिल बसावे, भिल-भिलावू, वारली, कोकणा, कोकणी, मालवणी, पावरी व कातकरी या 12 बोलीभाषेत अनुवाद करण्यात येत आहेत. त्यामुळे आदिवासींना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण घेता येणार आहे.
आदिवासी बहुल भागात त्यांच्या बोलीभआषेचा वापर दैनंदिन व्यवहारात होतो. मात्र, तेथील विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास व मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी प्रगतीत अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे स्थानिक बोली भाषांत भाषांतरित करण्याचा निर्णय घेतला, टप्प्याटप्प्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी बहुल विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे.
केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तकांचे कोरकू, गोंडी, भिल, माथवाडी, मावची माडिया, कोलामी, भिल बसावे, भिल-भिलावू, वारली, कोकणा, कोकणी, मालवणी, पावरी व कातकरी या बोलीभाषेत अनुवाद करण्यात येत आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'टीआरटीआय'ने त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करून इ. 1ली व 2री साठीची पुस्तके शासकीय आश्रमशाळांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण स्थानिक बोली भाषेत देण्याचा मानस आहे. जेणेकरून प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृध्दींगत होणे सुलभ होईल. बोलीभाषा ते प्रमाणभाषा असा विद्यार्थ्यांचा अध्ययन प्रवास असेल. त्यासाठी क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या.
0 Comments