Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; युनिफाईड पेन्शन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी | Unified Pension Scheme | एकात्मिक निवृत्तीवेतन योजना

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; युनिफाईड पेन्शन योजनेला केंद्र सरकारची मंजुरी Unified pension scheme Central government, Unified Pension Scheme | युनिफाईड पेन्शन योजना | एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेविषयी माहिती जाणून घेऊया.

Join WhatsApp
https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V


केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने UPS (Unified Pension Scheme) अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या (NPS) अंतर्गत असलेल्या केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. या नव्या योजनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी आर्थिक स्थैर्य मिळण्याचा मोठा लाभ होणार आहे.



Unified Pension Scheme | एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेंतर्गत मिळणारे लाभ


UPS या योजनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या निम्मे वेतन इतकी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जाईल. परंतु, यासाठी कर्मचाऱ्यांनी किमान २५ वर्षे सेवा बजावलेली असावी. १० ते २५ वर्षांच्या सेवाकाळात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळाच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळेल. विशेषतः, किमान १० वर्षे सेवा केलेल्यांना १०,००० रुपये निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.



शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय पेंशन योजना पहा. Click Here



Unified Pension Scheme | एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेंतर्गत महागाई भत्त्याचा लाभ


Unified Pension Scheme (ups)| एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेंतर्गत मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावर महागाई भत्ता (DA) देखील लागू होणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांना महागाईच्या प्रभावापासून संरक्षण मिळणार आहे. तसेच, जर एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला मूळ वेतनाच्या ६० टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जाईल.


Unified Pension Scheme | एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ग्रॅज्युइटी आणि सेवा लाभ


Unified Pension Scheme (ups) | एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीसह अतिरिक्त ठराविक रक्कम देखील दिली जाईल. ही रक्कम त्यांच्या सेवाकाळानुसार ठरवली जाईल. उदाहरणार्थ, ६ महिन्यांच्या पूर्ण केलेल्या सेवेसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश इतकी रक्कम दिली जाईल. ३० वर्षांच्या सेवाकाळासाठी सुमारे ६ महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळेल.


unified pension portal - click Here
unified pension portal link

Unified pension scheme

Post a Comment

0 Comments

close