राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 जाहीर. महाराष्ट्रातील 2 शिक्षकांचा समावेश. केंद्रीय शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची (National Teacher Award)घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके, सागर बगाडे (maitaiah bedke, sagar bgade ) या दोन शिक्षकांना 2024 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेल्या शिक्षकांचा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे.
सन 2023 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांविषयी माहिती जाणून घ्या - Click Here
प्रत्येक पुरस्कारामध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, रोख पुरस्कार आहे. 50,000/- आणि एक रौप्य पदक. हॉटेल 'द अशोक', 50-बी, डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह, चाणक्यपुरी, नवी दिल्ली 110021 (फोन: 011-26110101) येथे 3 सप्टेंबर (दुपारी) ते 6 सप्टेंबर 2024 (दुपारी) पर्यंत राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता हॉटेल अशोक, नवी दिल्ली येथे एक संक्षिप्त बैठक आयोजित केली जाईल.
देशातील 50 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली येथील मंतैह बेडके व कोल्हापूर येथील सागर बगाडे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विषयी माहिती वाचा

National Teacher Award 2024 selection list
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची माहिती
National Teacher Award 2024 announced
1) ΜΑΝΤAIAH CHINNI BEDKE मंतैय्या बेडके
Z. P. UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI, GADCHIROLI, MAHARASHTRA
गडचिरोलीच्या मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
2) SAGAR CHITTARANJAN BAGADE सागर बगाडे
SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR, MAHARASHTRA
0 Comments