शिक्षण सप्ताह उपक्रम यादी दिवस सातवा 28 जुलै 2024 - समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day (Annexure-7)
समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day साजरा करण्यासाठी आणि त्यानुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना/तत्त्वेः 👇🏻
परिशिष्ट 7
शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस सातवा
28 जुलै 2024 - समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day)
विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.
उद्दिष्टे -
1. शाळांचे सक्षमीकरण करणे.
2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय
3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे,
विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.
2. शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.
3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे,
4. विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.
6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे
7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.
8. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.
0 Comments