Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नमुना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ता PDF | इ. 5वी व इ. 8वी वार्षिक परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ता PDF डाउनलोड करा.

इ. 5वी व इ. 8वी वार्षिक परीक्षा | नमूना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ता PDF  डाउनलोड करा. | 5वी, 8वी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, मूल्यमापन कार्यपद्धती बाबत शासन निर्णय


महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अंतर्गत इ. 5वी व इ. 8वी ची वार्षिक परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी. या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्याच वर्गात ठेवण्यात येणार आहे. 



इ.5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत (परिपत्रक -29-02-2024) - Click Here





इयत्ता ५वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका, संविधान तक्ता



इयत्ता 8वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका, संविधान तक्ता




शासन निर्णय - 07 डिसेंबर 2023 

महाराष्ट्र शासन राजपत्र  / अधिसूचना

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९.

क्रमांक आरटीई २०२२/प्र.क्र. २७६ / एसडी - १. - बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ च्या कलम ३८ मधील उप-कलम (१) आणि (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा (सन २००९ च्या कलम ३५ मधील) वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मध्ये सुधारणा करीत आहे, ते म्हणजे

१. या नियमांना महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) असे म्हणावे. Click Here to Download

२. महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ च्या (यापुढे ज्याचा उल्लेख "मुख्य नियम" असा करण्यात येईल) नियम ३ मध्ये पोट-नियम (१) नंतर, खालील पोट-नियम समाविष्ट करण्यात येत आहे, ते महणजे :- 

(अ) इयत्ता ५वी च्या वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. 

(ब) इयत्ता ६वी ते ८वी च्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास इयत्ता ५वी च्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. बालक सदरची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला इयत्ता ५वी च्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.


३. मुख्य नियमांमधील नियम १० नंतर खालील नियम समाविष्ट केले जातील, म्हणजे :-

"१० (अ), कलम १६ च्या प्रयोजनार्थ, काही प्रकरणांमध्ये परीक्षा आणि बालकास मागे ठेवण्याच्या कार्यपद्धतीबाबतः-

(१) प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी इयत्ता ५वी आणि टवी च्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.

(२) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ता ५वी आणि ८वी च्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल.

(३) जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा बालकाला संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

(४) जर बालक पोट-नियम (३) मध्ये नमूद केलेल्या पुनर्परीक्षेत नापास झाले, तर त्याला इयत्ता ५वी च्या वर्गात किंवा इयत्ता 8वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल.

(५) प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही


ही तांत्रिक अडचण असेल? 

सद्यस्थितीत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. मात्र, आरटीईतील नियमानुसार सहा ते चौदा वयोगटातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव त्याच वर्गात ठेवता येत नव्हते. आता विद्यार्थी आठवीला अनुतीर्ण झाल्याने त्याच वर्गात ठेवता येईल. मात्र, त्यानंतर त्याचे वय वाढून चौदाव्या वर्षानंतर त्याला आरटीईचा नियम लागू होणार की नाही याचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. 


महाराष्ट्र अधिसूचना - महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here


शासन निर्णय - 07 डिसेंबर 2023


Post a Comment

0 Comments

close