Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

7 - स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swarajyache Toran Bandhale swadhyay / Online Test

स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swarajyache Toran Bandhale swadhyay / Online Test


स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली, पण किल्ल्यांशिवाय कसले आहे. स्वराज्य! ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला, की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैर्ऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका.

तोरणा हा अतिशय बळकट किल्ला पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, की दारूगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे त्यांनी ठरवले.

निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोन्यात उतरले. साया मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली.


स्वराज्याचे तोरण बांधले यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

स्वराज्याचे तोरण बांधले Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 


शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत तयार करुन घेतली होती. 

शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ -

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते 

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. 

Post a Comment

0 Comments

close