Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

8 - स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swakiy Shatruncha Bandobast swadhyay / Online Test

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swakiy Shatruncha Bandobast swadhyay / Online Test


प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. राजगड किल्ला बांधून तेथे स्वराज्याची राजधानी स्थापना केली. शिवरायांची घोडदौड सुरू झाली. शिवरायांनी बारा मावळांतील किल्ल्यांमागून किल्ले ताब्यात घेतले. बारा मावळांत आनंद आणि उत्साह यांना पूर आला, गावोगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले; परंतु तांदळात जसे काही खडे असतात, तसेच मावळांतही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले.

खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशाहाच्या चाकरीत होते. आदिलशाहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले. शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले.

फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, हे तर शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या. 

शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते. हा त्यांच्या सुपे परगण्यात होता. त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली.

शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यांत खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त करुन रायरीचा किल्ला जिंकला. 


स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत तयार करुन घेतली होती. 

शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ -

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते 

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. 

Post a Comment

0 Comments

close