Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

9 - प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Pratapgadavaril Parakram swadhyay / Online Test

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Pratapgadavaril Parakram swadhyay / Online Test


शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

अफजलखान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार. तुफान ताकदीचा ! पोलादी पहार हातांनी वाकवणारा. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा ! अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून आणण्याचा विडा उचलला. अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले, हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला खान कपटी, त्याची फौज मोठी. आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. जिजामातेशी सल्लामसलत करून, तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले.

छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेट - प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. शिवरायांनी भेटीची तयारी केली. 


अफजलखानाशी झटापट महाराज - शिवराय सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली.


प्रतापगडावरील पराक्रम यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

प्रतापगडावरील पराक्रम Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close