Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

10 - शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | sharthine khind ladhavali swadhyay / Online Test

शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | sharthine khind ladhavali swadhyay / Online Test


शायिस्ताखानाची फजिती स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. सिद्दी जौहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला.

वेढ्यातून निसटण्यासाठी शिवरायांची युक्ती

शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार, अशी ती योजना होती.


बाजीप्रभूचा पराक्रम 

घोडखिंडीत शर्थीची झुंज चालू होती. सिद्दी मसऊद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शीर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले.. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. "महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो" असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. 'पावनखिंड' या नावानेच इतिहासात ती अमर झाली.

शर्थीने खिंड लढवली यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

शर्थीने खिंड लढवली Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close