Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

1 - शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघडउघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत. आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती. 

संतांची कामगिरी स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. Click Here


शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 


शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र Online Test 👇

Loading.... तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close