जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 21 एप्रिल च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार असून सदर बदल्याचे पोर्टल 9 जून पासून सुरु करण्यात येत आहे.
बदली पोर्टल ला भेट देण्यास शिक्षकांस अवगत करणेबाबत परिपत्रक पहा.
शिक्षक बदली पोर्टल वापराबाबत - शासन परिपत्रक - 10 जून 2022
♦️ बदली पोर्टल वापराबाबत शिक्षकांना अवगत करावे.
♦️ बदल्या सन 2020-21 च्या संचमान्यतेवर होणार
♦️ आंतरजिल्हा बदलीसाठी रोस्टर पूर्ण आवश्यक. रोस्टर नसेल तेथे साखळी बदल्या.
♦️ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर
online teacher transfer application 2022
Teacher's Transfer Portal Login - Click Here
शिक्षक बदली पोर्टल लॉगीन - Click Here
ott portal - Online Teachers Transfer Portal - https://ott.mahardd.in/
वरील लिंक वरुन आपला मोबाईल टाकून आपली माहिती पाहू शकता प्रोफाईल अपडेट करु शकता.
13 जून पासून शिक्षकांना स्वतः चे प्रोफाईल BEO लॉगीन ला पाठवता येणार आहे.
ott portal - Online Teachers Transfer Portal - https://ott.mahardd.in/
🚩 *बदली पोर्टल अपडेट -*
👉🏻 *Profile Update ची सुविधा सुरू झाली आहे. परंतु जोपर्यंत अधिकृत सूचना मिळत नाहीत तोपर्यंत कोणीही माहितीत बदल करू नये. तशा अधिकृत सूचना शिक्षण विभागाकडून आपणास मिळतील किंवा वेळापत्रक प्रकाशित होईल*
👉🏻 *सदर पोर्टल नव्यानेच असल्याने व एकाच वेळी अनेक शिक्षक पोर्टलला भेट देत असल्याने सुरुवातीला काही अडचणी येणे संभव आहे.*
👉🏻 *आतापर्यंत अनेकजणांना लॉगिन करताना सुरूवातीला OTP प्रॉब्लेम येत आहे. तो दूर झाला आहे. तरीही मोबाईलवर OTP येत नसेल तर दिलेल्या मेल आयडी मधील inbox किंवा spam फोल्डर चेक करावे.*
👉🏻 *आतापर्यंत जवळपास ८१ हजार शिक्षकांनी पोर्टल ला भेट दिली आहे. पैकी ३५ हजार शिक्षकांनी आपली सेवा विषयक माहिती अपडेट केली आहे. असे महितीद्वारे कळाले आहे*
👉🏻 *१३ ते २२ जून पर्यंत माहिती अपडेट करता येईल. त्यावेळी पूर्ण क्षमतेने सदर साईट सुरू राहील.*
-#-#-#-#-#-#-#-#-#-#
🤔 प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?
👉🏻 बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
👉🏻 माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
#-#-#-#-#-#-#-#-#
📲 बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे ?
👉🏻 बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करा.
👉🏻 बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.
👉🏻 Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.
👉🏻 profile अपडेट करण्याची सुविधा दि. 13-06-2022 ते 22-06-2022 पर्यंत आहे, असे कळते.
👉🏻 Personal Details मधील माहिती आपल्याला बदलवता येणार नाही.
👉🏻 Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक भरावयाची आहे. तरी काळजीपूर्वक भरा. यासाठी शक्य होत असल्यास जवळील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
👉🏻 Date of Apponitment- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. प्रत्यक्ष शाळेवरील रुजू दिनांक भरावा.
👉🏻 Cast category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा. आपल्या मूळ नियूक्ती आदेशावर दिलेली आहे.
👉🏻 Appointment category- ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Current District Joining Date- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा.
👉🏻 Udise Code of Current School कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
👉🏻 Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांनी भाषा / गणित-विज्ञान / समाजशास्त्र यापैकी सिलेक्ट करा. इतरांनी Not Avaible हे ऑप्शन निवडा.
👉🏻 Teaching medium या मध्ये Marathi निवडा.
👉🏻 Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होवून आलात तो प्रकार ड्रॉप लिस्ट मधून सिलेक्ट करा लागून नसल्यास N/A सिलेक्ट करा
#-#-#-#-#-#-#-#-#
📍📌🪂 बदली पोर्टल संदर्भात माहिती ही माझ्या सद्सद्विवेक बुद्धीने, प्राप्त माहितीआधारे आपणास मदत व्हावी म्हणून दिली आहे. सर्व सूचना प्रशासनाच्या अंतिम राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शिक्षक बदली पोर्टल संदर्भात सर्व मार्गदर्शक Video पहा. - Click Here
shikshak badli 2022
0 Comments