Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

9 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

2 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp


इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - गेली चपाती आली चपाती
भौंकूच्या चपातीचा मजेदार प्रवास वाचा !

Download link - Click Here



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - उल्लू आहेस का? 
खारीचं पिल्लू वेड्यासारखं वागलं की, त्याची आई त्याला उल्लू म्हणते. आई आपल्याला ‘उल्लू’ का म्हणते हे पिल्लाला मुळी कळायचंच नाही. एके दिवशी ते एका खऱ्याखुऱ्या उल्लूला भेटतं. मग काय झालं असेल?

Download link - Click Here



इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - इकडे दिवस, तिकडे रात्र
माधव आणि यारेत्झी पृथ्वीवर एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजूला असलेल्या देशांत राहतात. माधवकडे जेव्हा रात्र असते, तेव्हा यारेत्झीकडे मात्र दिवस असतो. त्या दोघांनाही चांदण्या एकाच वेळेला का बरं दिसत नाहीत? वेळेतल्या या फरकाबद्दल जाणून घेण्यासाठी ही गोष्ट नक्की वाचा.

Download link - Click Here



इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - आजीचं सोनं
 
आजी आणि अप्पा हे दोघंही शेतातल्या भातपिकाचं उत्पन्न कमी होत असल्यानं चिंतेत आहेत. आजीकडे मात्र यावर एक उत्तर आहे. ते तिच्या कपाटातल्या एका लाकडी खोक्यात दडलेलं आहे. तिचं हे रहस्य सोन्याहूनही मौल्यवान आहे. देशी वाणाच्या बियाण्यांची शक्ती आजी कशी उलगडून दाखवते, हे तिची नातवंडं सावी आणि सेल्वनबरोबर आपणही या शेतीविषयक पुस्तकातून जाणून घेऊ या!

Download link - Click Here





Share with your friends

Post a Comment

0 Comments

close