Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

16 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

9 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp

इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - माझे कुटुंब
माझे कुटुंब खूप मोठे आहे. तुम्हाला त्यांना भेटायचे आहे का?

Download link - Click Here
Web link - Click Here



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - गणिताची जत्रा
लीलू तिच्या वर्गातल्या ३६ मुलांसोबत जत्रेला आली आहे. पण प्रत्येक ठिकाणी किती तिकिटं काढायची हे ठरविण्यासाठी किंवा कुणी हरवलं नाहीये ना, याची खात्री करण्यासाठी तिच्या सरांना सतत मुलं मोजावी लागताहेत. १,२,३... या पद्धतीने मोजण्यापेक्षा ३६ मुलं मोजण्याची एखादी सोपी पद्धत आहे का? एखादी संख्या पटीत मोजण्याची संकल्पना म्हणजेच पाढ्यांची संकल्पना इथं एका रंजक कथेतून सांगितली आहे.

Download link - Click Here
Web link - Click Here



इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - कावळ्याने नातलगांना बोलावले
कावळ्याला ना कोकिळेचा आवाज, ना मोरासारखा सुंदर तुरा. पण त्याचा एक गुण, गोड आवाज आणि सौंदर्य यांपेक्षा सरस आहे. कोणता आहे तो गुण?

Download link - Click Here
Web link - Click Here




इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - वाढदिवसाचा केक
आझाद, हनिया, चारूलता आणि पियूषला त्यांच्या घरासमोरच्या गल्लीत खेळायला आवडतं. पण गल्लीच्या एका टोकाशी राहणाऱ्या खाष्ट म्हातारीची नजर चुकवून बरं का! एके दिवशी ‘आज तिचा वाढदिवस आहे’ हे त्यांना समजतं. मग हे चारही दोस्त तिच्यासाठी केक बनवायचं ठरवतात. कारण कोणालाच आपला वाढदिवस एकट्यानं घालवावा लागता कामा नये ना? वाचू या, आपुलकीची आणि सहानुभूतीची ही गोड गोष्ट.


Download link - Click Here
Web link - Click Here





Share with your friends

Post a Comment

0 Comments

close