फुलांचे संमेलन | इयत्ता दुसरी | विविध फुलांची मराठी व इंग्रजी नावे
एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. जाई, जुई, कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी! पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते.
निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. गुलाबराजे उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. "माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरखून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो; पण आज माझे स्वागत! मन अगदी प्रसन्न झाले. मित्रांनो, आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद!"
सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या. जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली.
विविध फुलांची मराठी व इंग्रजी नावे
विविध फुलांची मराठी व इंग्रजी नावे
- Aster - ऍस्टर
- Blue pea - गोकर्णी
- Bogainvillea - बोगणवेल
- Canna Indica - कर्दळ
- Cactus - निवडूंग
- chrysanthemum - शेवंती
- common Flax - अळशी
- Commom Jasmine - जुई
- Coral Jasmine - पारिजातक
- Crape Jasmine - तगर
- crossandra - अबोली
- cypress vine - गणेशवेल
- Dafodill - नर्गिस
- Dahlia - डेलिया
- Daisy flower - गुलबहर
- Datura - धोतरा
- Delonix Regia - गुलमोहर
- Four O'clock - गुलबक्षी
- Gaint Milkweed - रुई
- Golden Frangipani - सोनचाफा
- Hibiscus - जास्वंद
- Jarul Flower - ताम्हण
- Jasmine Sambac - मोगरा
- Jasminum Grandiflorun - जाई
- Jasminum Sambac - मोगरा
- Lantana Camera - घाणेरी
- Lily - लीली
- Lotus - कमळ
- Magnolia - चंपा
- Marigold - झेंडू
- Mexican Tuberose - रजनीगंधा
- Narcissus - नर्गिस
- Night Cestrum - रातराणी
- Oleander flower - कण्हेर
- Pansy - पानसडी
- Peacock Flower - शंकासूर
- Periwinkle - सदाफुली
- Pride of India - ताम्हण
- Rangoon Creeper - मधुमालती
- Rose - गुलाब
- Saussurea Obvallata - ब्रम्ह कमळ
- Screw Pine - केतकी
- Silver Cockscomb - कुरडू
- Spanish Cherry - बकुळ
- Spanish Jasmine - चमेली
- Sunflower - सूर्यफूल
- Sweet Granadilla - कृष्णकमळ
- Tanner's Cassia - तरवड
- Touch me not - लाजाळू
- Tulip Flower - कंदपुष्प
- Violet Asytasia - नीलकंठ
- Water Snowflake - कुमुदिनी
- Zinnia - झिनिया
0 Comments