Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

5 मार्च | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 


गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

26 फेब्रुवारी | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp


इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - हे आहे तरी काय❓
जंगलातल्या नवीन गायकाला भेटा!
Download link - Click Here
Read Here 👇  चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - गप्पूला येईना नाचता
गप्पूला मुळ्ळीच नाचता येत नाही हे पहिली ‘अ’च्या वर्गातल्या सगळ्या मुलांना माहीत आहे. जेव्हा मुलं डावा हात वर करतात, ती तिचा उजवा हात वर करते. कोमलताई गप्पूला नाच शिकवू शकेल का? नाच करण्यात कशी मज्जा असते, हे या गोष्टीत विरुद्धार्थी शब्द योजून सांगतलेले आहे.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 


इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - जेव्हा जंगल जागं होतं
सकाळी गर्जना करत सूर्य बाहेर झेपावला, जंगलाला जाग आली आणि एक नवीन कोरा दिवस सुरू झाला. जंगलानं पुन्हा नवीन खेळ मांडायला घेतला. या नव्या दिवशी जंगल कसं असेल? सर्व जीवांमध्ये आत्मा असतो अशी समजूत गोंड जमातीत वर्षानुवर्षं चालत आली आहे. त्या समजुतीतूनच आलेली ही छानशी गोष्ट! त्यात सूर्यापासून दगडांपर्यंत सगळं काही अगदी माणसांइतकंच जिवंत आहे.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 


इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - आमचं वाचनालय
तुम्हाला कार आणि डायनासोर आवडतात? आणि त्यांच्याबद्दल वाचायलाही आवडतं? तुम्हाला काही प्रश्न पडले आहेत? काही कल्पना सुचल्या आहेत? त्याबद्दल तुम्हाला काही वाचायचं आहे? एखाद्या शांत कोपऱ्यात बसून तुम्हाला एकट्यानंच वाचायची इच्छा आहे? या तर मग, आमच्या वाचनालयात तुमचं स्वागत आहे!
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 
 






Share with your friends

Post a Comment

0 Comments

close