Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Rangotsav competition 2023-2024 | रंगोत्सव कार्यक्रम सन 2023-2024 | कार्यक्रम विषय, नोंदणी लिंक, उद्देश, अंतिम मुदत, मूल्यमापन

राज्यातील प्राथमिक स्तरावरील शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी/शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 आयोजित करण्यात येत आहे. Rangotsav competition 2023-2024 रंगोत्सव कार्यक्रम विषय, नोंदणी लिंक, उद्देश, अंतिम मुदत, मूल्यमापन बाबत सर्व माहिती जाणून घेऊया. 



रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 चा उद्देश

  1. अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय विद्याथ्यर्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे
  2. विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे
  3. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.


रंगोत्सव कार्यक्रम 2203-24 विषय / theme

रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळांनी गोष्टी , खेळ आधारित अध्यापन, कला व क्रीडा या माध्यमातून शिक्षण (Experiential Learning) यासंबंधी ५ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून त्याची लिंक अपलोड करावयाची आहे. (Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, Story Telling) या चार मुद्दयांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांना विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ तयार करावेत. सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खुला आहे.

वरील विषयानुसार तयार केलेल्या Video ची लिंक https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6 या गुगल लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करावयाचे आहेत.


रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 नोंदणी लिंक. https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6



राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे सहकार्याने सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि व्हिडीओची लिंक पेस्ट करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. 


रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 अंतिम मुदत

दि. ७ मार्च २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरून वरील ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक या प्रमाणे व्हिडीओची लिंक दि. ७ मार्च २०२४ पर्यंत लिंकवर पेस्ट करणे हे करणे अपेक्षित आहे. 

रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 लिंक. https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6



रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 video निवड

तद्नंतर लिंकवर प्राप्त व्हिडीओंचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर ३ परीक्षकांची एक समिती गठीत करून उत्कृष्ठ व्हिडीओंची निवड करण्यात येऊन दि. १८ व १९ मार्च रोजी राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल.


रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 प्रमाणपत्र

राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास, विविध उत्कृष्ट कृतीं पैकी उत्तम सादरीकरण, उत्तम परिणामकारकता, गटातील एकसंघ भावना इत्यादी करिता प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील. राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.


यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असे पाहावे.


रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करणेसंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.

रंगोत्सव कार्यक्रम 2023-24 गुगल लिंक - https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6


Rangotsav competition 2024

Rangotsav competition 2024 theme

Rangotsav competition 2024 results

Rangotsav competition 2024 winner list

रंगोत्सव कार्यक्रम 2024

रंगोत्सव कार्यक्रम 2024 विषय

रंगोत्सव कार्यक्रम 2024 निकाल

Post a Comment

0 Comments

close